Cyclone Biparjoy: 'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने रद्द केल्या 67 गाड्या; CPRO यांची माहिती, जाणून घ्या यादी

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने सोमवारी (12 जून) 67 गाड्या रद्द केल्या आणि 13 जून ते 15 जून या कालावधीत 95 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

Indian Railways | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

चक्रीवादळ बिपरजॉयमुळे हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. वादळाचा प्रभाव गुजरातच्या किनारपट्टीच्या कच्छवर तसेच महाराष्ट्रातील अनेक किनाऱ्यांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. या चक्रीवादळामुळे कोणतीही हानी होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज व सतर्क आहे. चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने सोमवारी (12 जून) 67 गाड्या रद्द केल्या आणि 13 जून ते 15 जून या कालावधीत 95 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. रेल्वेने आज रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती दिली आहे. यासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही बिजपरजॉय संदर्भात अलर्ट देण्यात आला आहे. (हेही वाचा: चक्रीवादळ बिपरजॉयमुळे समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; गणपतीपुळे येथे किनाऱ्यावरील पर्यटकांना तडाखा Watch

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement