Boyfriend Stabbed His Girlfriend: डॉक्टर प्रेयसीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; Jammu मधील धक्कादायक घटना
प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच चाकूने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
जम्मू शहरात एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. वृत्तानुसार, तरुणाने पेशाने डॉक्टर असलेल्या आपल्या गर्लफ्रेंडवर चाकूने वार केले सुमेधा शर्मा, तलब टिल्लो, जम्मू असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे, तर आरोपी जोहर गनी हा जानीपूर, जम्मूचा रहिवासी आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच चाकूने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सूत्राने सांगितले की, तरुणावर जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहितीनुसार सुमेधा 7 मार्चला होळीसाठी घरी आली होती आणि तिचा प्रियकर जोहरच्या घरी थांबली होती. दोघांमध्ये कथितरित्या भांडण झाले, त्यानंतर आरोपी जोहरने तिच्यावर चाकूने वार केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)