Bihar Shocker: 'मिळून साऱ्याजणी' विष प्यायल्या; चौघींपैकी एकीचा मृत्यू, तिघींची प्रकृती चिंताजनक, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना
यातील एका मुलीचा गया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तीन मुलींची प्रकृती चिंताजनक असून, त्या रुग्णालयात जीवाशी झुंज देत आहेत.
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात सांडा बाजार येथील चार मैत्रिणींनी रविवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांना तातडीने औरंगाबादला लागून असलेल्या झारखंडमधील हरिहरगंज येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना औरंगाबादच्या सदर रुग्णालयात पाठवण्यात आले. सदर रुग्णालयात त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. शेवटी डॉक्टरांनी त्यांना चांगल्या उपचारासाठी मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल गया येथे रेफर केले. यातील एका मुलीचा गया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तीन मुलींची प्रकृती चिंताजनक असून, त्या रुग्णालयात जीवाशी झुंज देत आहेत. या चार पैकी दोन मुली बहिणी आहेत. या घटनेमागील कारण अद्याप समोर आले नाही. या मुली 18 ते 20 वयोगटातील आहेत. (हेही वाचा: Madhya Pradesh Shocker: ग्वाल्हेरमध्ये 17 वर्षीय तरुणीचे फेसबुक फ्रेंडकडून अपहरण; पीडितेवर सामूहिक बलात्कार, आरोपीला अटक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)