Bharat Mandapam: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले दिल्लीतील ITPO संकुलाचे उद्घाटन; नाव दिले ‘भारत मंडपम’ (Watch Video)

हे सिडनीच्या ऑपेरा हाऊसपेक्षा मोठे केंद्र आहे. ऑपेरा हाऊसमध्ये 5500 लोकांची बसण्याची क्षमता आहे, तर भारत मंडपममध्ये 7000 लोकांची बसण्याची क्षमता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ड्रोन उडवून नवी दिल्लीत नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-कम-कन्व्हेन्शन सेंटर (IECC) संकुलाचे उद्घाटन केले. याला 'भारत मंडपम' असे नाव देण्यात आले आहे. या स्मरणार्थ पंतप्रधान मोदींनी खास तिकीट आणि नाण्यांचेही प्रकाशन केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी दिल्लीत जगातील सर्वात मोठे संग्रहालय बांधण्याची घोषणा केली. तसेच माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

तत्पूर्वी आज सकाळी पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी हवन-पूजन केले. सुमारे 2700 कोटी रुपये खर्चून कन्व्हेन्शन सेंटरचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी 9 आणि 10 सप्टेंबर रोजी 18 वी G-20 बैठक आयोजित केली जाणार आहे. हे सिडनीच्या ऑपेरा हाऊसपेक्षा मोठे केंद्र आहे. ऑपेरा हाऊसमध्ये 5500 लोकांची बसण्याची क्षमता आहे, तर भारत मंडपममध्ये 7000 लोकांची बसण्याची क्षमता आहे. हा कॅम्पस अंदाजे 123 एकरमध्ये पसरलेला आहे. याला प्रगती मैदान कॉम्प्लेक्स असेही म्हणतात. येथे संमेलने, परिषदा, प्रदर्शने आयोजित करता येतात. (हेही वाचा: No Confidence Motion: केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव, काँग्रेसकडून खासदारांना व्हीप जारी)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement