Ayodhya Ram Mandir: अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये दुसर्‍या दिवशीही भाविकांचा जनसागर दर्शनासाठी उसळला (Watch Video)

राम भक्तांनी पहिल्याच दिवसापासून रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.

राम दर्शन । PC: (X/ ANI)

22 जानेवारीला अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता दर्शनाला भक्तांची मोठी रांग लागली आहे. भक्तांचा जनसागर उसळल्यानंतर आता अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आज राम मंदिर भक्तांसाठी खुलं झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी देखील मोठी गर्दी पहायला मिळत आहे. कुडकुडत्या थंडीतही लोक येत आहेत. दरम्यान गर्दी पाहता आता मंदिर प्रशासनाने भाविकांना मंदिरात येण्याची घाई न करण्याचं आवाहन केले आहे. नक्की वाचा: Biggest Tourist Center of India: अयोध्या बनणार देशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र, दरवर्षी 5 कोटी लोक भेट देणार- Jefferies Report .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)