Avantika Express Water Leak Videos: पावसात भारतीय रेल्वेचे वाईट हाल; मुंबई-इंदूर अवंतिका एक्स्प्रेसचा एसी डबा लागला गळू, प्रवाशांचा संताप
व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.
सध्या देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. एकीकडे यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे पावसामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या अवंतिका एक्सप्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेल्वेच्या एसी डब्यात पाणी गळत आहे. व्हिडिओ मुंबईहून इंदूरला जाणाऱ्या अवंतिका एक्स्प्रेसच्या एसी डब्याचा आहे, ज्यामध्ये पाणी गळत असल्याचे दिसत आहे. ट्रेनच्या छतावरून पाणी गळू लागल्याने प्रवासी प्रचंड नाराज झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच काँग्रेसला सरकारवर हल्लाबोल करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे. या प्रकाराबाबत सोशल मीडियावरही रेल्वेवर टीका होत आहे. (हेही वाचा: Haryana Flash Flood: हरीयाणामध्ये नदीला महापूर, पंचकुला येथे वाहने पाण्यात अडकली, नागरिकांचीही गैरसोय)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)