Asaram Bapu Gets Parole: राजस्थान उच्च न्यायालयाकडून आसाराम बापूला दिलासा, 11 वर्षांत प्रथमच 7 दिवसांचा पॅरोल मिळाला
यापूर्वी आसारामला जोधपूर येथील खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. तेथे आसारामने पुण्यातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतले.
Asaram Bapu Gets Parole: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला प्रथमच सात दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. पॅरोलच्या काळात आसारामला महाराष्ट्रातील माधोबागमध्ये उपचार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कालावधीत तो पोलीस कोठडीत राहणार आहे. याआधी अनेकवेळा आसारामने उपचारासाठी पॅरोलसाठी अर्ज केला होता, मात्र तो प्रत्येक वेळी फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले. आता आसारामने पॅरोल अर्ज दाखल केला होता, तो स्वीकारण्यात आला आणि उपचारासाठी 7 दिवसांच्या पॅरोलचे आदेश देण्यात आले. 85 वर्षीय आसाराम बापू 2013 पासून जोधपूर तुरुंगात बंद आहे. आसारामला जोधपूर पोलिसांनी 2013 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी इंदूर येथून अटक केली होती. (हेही वाचा: Asaram Bapu life imprisonment: असाराम बापू याला जन्मठेप, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)