Asaram Bapu life imprisonment: असाराम बापू याला जन्मठेप, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण
स्वयंघोषीत बाबा असाराम बापू (Asaram Bapu) याला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) ठोठावण्यात आली आहे. सन 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाने (Gandhinagar Sessions Court) ही शिक्षा मंगळवारी (31 जानेवारी) सुनावली. आसाराम याला गांधीनगर न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले.
स्वयंघोषीत बाबा असाराम बापू (Asaram Bapu) याला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) ठोठावण्यात आली आहे. सन 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाने (Gandhinagar Sessions Court) ही शिक्षा मंगळवारी (31 जानेवारी) सुनावली. आसाराम याला गांधीनगर न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. त्यांनंतर न्यायालाने राखून ठेवलेला निर्णय आज दिला. आसारामच्या एका माजी शिष्याच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात ही शिक्षा ठोठावण्यात आली.
आसाराम बापू आणि इतर सहा जणांविरोधात अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) नोंदविण्यात आला होता. या एफआयआरमध्ये स्वत:ला धर्मगुरु समजणाऱ्या या बापूने 2001 पासून सुरत येथील महिला शिष्यावर अनेक वेळा बलात्कार केला होता. अखेर ती आश्रमातून पळून जाण्यात यशस्वी झाली. तत्पर्वी ती अहमदाबादजवळील मोटेरा येथील बापूच्या आश्रमात राहत होती. (हेही वाचा, Asaram Bapu Convicts in Rape Case: बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी; उद्या सुनावली जाणार शिक्षा)
ट्विट
Gandhinagar Sessions Court sentenced self-styled godman Asaram to life imprisonment in connection with a decade-old sexual assault case. pic.twitter.com/UgIdHOsuiq
— ANI (@ANI) January 31, 2023
दरम्यान, सत्र न्यायालयाने याच प्रकरणात आसाराम बापू याची पत्नी लक्ष्मीबेन, त्याची मुलगी आणि इतर चार शिष्यांसह इतर सहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या सर्वांवर आसाराम करत असलेल्या गुन्ह्यात मदत आणि प्रोत्साहन दिल्याचा आरोप होता.
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2023 04:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

