Agniveer Amritpal Singh Dies: काश्मीरमध्ये तैनात अग्निवीर अमृतपाल सिंगचा गोळी लागल्याने मृत्यू

अमृतपाल सिंह 10 डिसेंबर 2022 रोजी भारतीय सैन्यात दाखल झाला होता.

Agniveer (प्रातिनिधिक | संग्रहित-संपादित प्रतिमा)

मनसा जिल्ह्यातील कोटली कलान या गावातील अवघ्या 19 वर्षीय अग्निवीर अमृतपाल सिंगने जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये सर्वोच्च बलिदान दिले आहे. भारतीय लष्कराने सांगितले की, अमृतपाल सिंहचा 11 ऑक्टोबर 2023 रोजी मृत्यू झाला. अग्निवीर अमृतपाल सिंगचा राजौरी सेक्टरमध्ये सेन्ट्री ड्युटीवर असताना, लागलेल्या बंदुकीच्या गोळीमुळे झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला. अमृतपाल सिंगवर शुक्रवारी कोटली कलान या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. रेजिमेंट 10-जेके रायफल्सचे जवान, पोलीस, नागरी प्रशासन आणि माजी सैनिकांनी पुष्पहार अर्पण करून अमृतपाल सिंगला अभिवादन केले. अधिक तपशील तपासण्यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू असल्याचेही लष्कराने म्हटले आहे. अमृतपाल सिंग हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अमृतपाल सिंह 10 डिसेंबर 2022 रोजी भारतीय सैन्यात दाखल झाला होता. (हेही वाचा: Terrorists of Lashkar-e-Taiba Arrested: लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक; दोन आयईडी-हँड ग्रेनेड, डिटोनेटर-बॅटरी जप्त)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)