ABVP Members Attack Vice-Chancellor: गोरखपूर विद्यापीठात एबीव्हीपी कार्यकर्त्यांचा गोंधळ; कुलगुरूंना पाठलाग करून मारहाण, व्हिडिओ व्हायरल (Watch)
या गोंधळात कुलगुरू, कुलसचिव, 3-4 अभाविप कार्यकर्ते आणि काही पोलीस जखमी झाले. सर्वांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी खळबळ उडाली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी गोरखपूरमधील दीनदयाल उपाध्याय विद्यापीठातील (DDU) कुलगुरूंच्या दालनाची तोडफोड केली. दरवाजा उखडून फेकून दिला. यानंतर कुलगुरू आणि कुलसचिवांचा पाठलाग करून मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही त्यांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. या गोंधळात कुलगुरू, कुलसचिव, 3-4 अभाविप कार्यकर्ते आणि काही पोलीस जखमी झाले. सर्वांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी खळबळ उडाली आहे. तीन ते चार पोलीस ठाण्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विद्यापीठाचे विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांचे हे धरणे विद्यापीठातील फी वाढीबाबत आहे. विद्यापीठात या नव्या सत्रात 400 टक्के फी वाढ करण्यात आली असून, ती विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कुलगुरूंच्या आश्वासनानंतरही कोणताही प्रश्न सुटला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले, त्यानंतर आज कुलगुरूंना मारहाण करण्यात आली. (हेही वाचा: Dogs Poisoned, Burned in UP Video: गोरखपूरच्या व्यापाऱ्याने कुत्र्यासह पिल्लांना देखील दिले विष, नंतर सात पिल्लांचे मृतदेह पेट्रोलने जाळले)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)