'सद्गुरु यांची स्वतःची मुलगी विवाहित, मग ते इतर महिलांना संन्यासीसारखे जगण्यासाठी का प्रोत्साहन देत आहेत?'- Madras High Court चा प्रश्न

मद्रास हायकोर्टाने नमूद केले की, ‘सद्गुरूंची स्वतःची मुलगी विवाहित आहे आणि चांगले जीवन जगत आहे, तर मग ते इतर तरुणींना सांसारिक जीवनाचा त्याग करण्यास आणि त्यांच्या योग केंद्रांमध्ये संन्यास घेण्यास का प्रोत्साहन देत आहेत?’

Sadhguru Jaggi Vasudev (Photo Credits: ANI)

सद्गुरु जग्गी वासुदेव हे देशातील एक लोकप्रिय आध्यात्मिक गुरू आणि योग-ध्यानाचे उपदेशक आहेत. त्यांनी भारतातील कोईम्बतूर येथे ईशा फाउंडेशनची स्थापना केली. हा आश्रम आध्यात्मिक आणि योग केंद्र चालवते. सद्गुरूंनी आपल्या विचारांतून लाखो लोकांना जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन दिला आहे. आता मद्रास उच्च न्यायालयाने सद्गुरु जग्गी वासुदेव यांना त्यांच्या शिकवणीवर प्रश्न विचारले. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एम सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती व्ही शिवग्ननम यांनी सोमवारी (30 सप्टेंबर) एका सुनावणीदरम्यान त्यांना विचारले की, तुम्ही तरुणींना संन्यास घेण्यास का सांगत आहात?

मद्रास हायकोर्टाने नमूद केले की, ‘सद्गुरूंची स्वतःची मुलगी विवाहित आहे आणि चांगले जीवन जगत आहे, तर मग ते इतर तरुणींना सांसारिक जीवनाचा त्याग करण्यास आणि त्यांच्या योग केंद्रांमध्ये संन्यास घेण्यास का प्रोत्साहन देत आहेत?’ कोईम्बतूर येथील कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक एस कामराज यांच्या वतीने उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे प्रश्न उपस्थित करण्यात आले. याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, आपल्या दोन शिकलेल्या मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांना ईशा फाऊंडेशनच्या योग केंद्रात ठेवण्यात आले आहे. याचिकाकर्त्यानुसार, त्यांच्या दोन मुलींचे वय 42 आणि 39 वर्षे आहे. (हेही वाचा: SC On Bulldozer Action: 'आपला देश धर्मनिरपेक्ष आहे... मंदिर असो की दर्गा कोणीही अडथळे निर्माण करू शकत नाही'; बुलडोझरच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी)

मद्रास उच्च न्यायालयाचा सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा प्रश्न-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement