Meerut Car Crash Video: टोल प्लाझाच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली कार, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

दिल्लीहून येणाऱ्या एका कारने टोल प्लाझावर महिला कर्मचाऱ्याला धडक दिली. दोघांमध्ये टोला भरण्यावरून वाद झाला होता.

Meerut Car Crash Video: PC ANI

Meerut Car Crash Video: दिल्ली मेरठच्या एक्स्प्रेस वेवर एक धक्कादाकाय घटना घडली आहे. दिल्लीहून येणाऱ्या एका कारने टोल प्लाझावर महिला कर्मचाऱ्याला धडक दिली. दोघांमध्ये टोला भरण्यावरून वाद झाला होता. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली आहे. तीला जवलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, दिल्लीहून येणाऱ्या कारने टोल देण्यावरून वाद सुरु केला. त्यानंतर टोल कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार घातली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही गंभीर घटना आहे. अश्या घटना पुन्हा घडून नये त्यामुळे प्रशासनाने योग्य कारवाई करावी अशी माहिती टोलचे व्यवस्थापक अनिल शर्मा यांनी दिली. (हेही वाचा- दिल्लीत चोरांनी भिंतीला खड्डापाडून टाकला ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)