Chardham Yatra 2023: चारधाम यात्रेदरम्यान भाविकांना ड्रोनद्वारे उपलब्ध करून दिली जाणार औषधे

चारधाम यात्रेत आपत्कालीन काळात ड्रोनच्या माध्यमातून भाविकांना औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

Medicine to be provided by drone (PC - Twitter)

Chardham Yatra 2023: उत्तराखंडची जगप्रसिद्ध चारधाम यात्रा 22 एप्रिलपासून सुरू होत आहे. चारधाम यात्रेत आपत्कालीन काळात ड्रोनच्या माध्यमातून भाविकांना औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासोबतच भाविकांसाठी त्रिस्तरीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी उत्तराखंडचे आरोग्य मंत्री डॉ.धन सिंह रावत यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली. ते म्हणाले की, लाखो भाविक चारधामला भेट देतात. खडतर मार्गामुळे यात्रेकरूंसमोरील आरोग्यविषयक आव्हाने गेल्या काही वर्षांत वाढली आहेत. (हेही वाचा - HC On Custody To Father: मुलगी आईसोबत Comfortable नसेल तर तिला वडिलांच्या ताब्यात देणे आवश्यक; पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)