Fire Breaks Out at Sahithi Pharma Company: विशाखापट्टणममधील फार्मा लॅबच्या रिअॅक्टरमध्ये भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; 4 जण जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे अनेक लोक आत अडकल्याची भीती आहे. स्फोटामुळे चार जण गंभीररित्या भाजल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Fire Breaks Out at Sahithi Pharma Company: विशाखापट्टणमजवळील अनकापल्ली जिल्ह्यातील एसईझेडमधील साहित्य फार्मा लॅबच्या रिअॅक्टरमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटानंतर घटनास्थळी आग लागली, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. अच्युतापुरम सेझमधील साहित्य फार्मा युनिटमध्ये हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे अनेक लोक आत अडकल्याची भीती आहे. स्फोटामुळे चार जण गंभीररित्या भाजल्याची माहिती पोलिसांनी दिली. (हेही वाचा - Alcohol Now Allowed in Delhi Metro: दिल्ली मेट्रोमध्ये प्रति व्यक्ती दोन सीलबंद दारूच्या बाटल्या वाहून नेण्यास परवानगी; DMRC समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)