Robbery Caught on CCTV:  दिल्लीतील (Delhi) उस्मानपूर भागात लोकांना लुटताना एक टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गजबजलेल्या रस्त्यावर सात ते आठ जण बंदूक हातात घेऊन  रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना थांबवून त्यांचे सामान लुटत आहे. बंदूकीचा धाक दाखवत चोरट्यांनी अनेकांंकडून सामान लुटले. ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.  या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. एकाने यावर प्रतिक्रिया दिली की, चोरट्यांना पोलिसांचा धाक उरलाच नाही. चोरट्यांनी स्थानिकांकडून बॅग, दागिने आणि पर्स चोरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या प्रकरणी एकाने पोलिसांनी या प्रकरणी दखल घ्यावी अशी विनंती केली आहे.  ( हेही वाचा- बागेतील आंबे घेतल्यामुळे अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण; गुन्हा दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)