Karnataka Shocker: रस्त्यात खेळताना 3 वर्षाच्या मुलीला कारने चिरडले, घटना कॅमेरात कैद

कर्नाटकच्या बेंगळुरुमध्ये एका ३ वर्षाच्या मुलीला कारने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

Karnataka Shocker

Karnataka Shocker: कर्नाटकच्या बेंगळुरुमध्ये एका 3 वर्षाच्या मुलीला कारने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दुर्दैवाने या घटनेचा मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी 9 डिसेंबर रोजी घडली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे मुल रस्त्यावर खेळत होते. इमारतीच्या सोसायटीच्या पार्किंगमधून एसयुव्ही कार बाहेर येत असते. दरम्यान कारने मुलीचा चिरडले. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद होते. गाडीखाली चिमुकलीला चिरडले हे कार चालकाला कळलेच नाही. अंगाला काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कार मुलीच्या अंगावरून जाते त्यानंतर मुलगी गंभीर जखमी होते. मुलीला उपस्थित एक स्थानिक रुग्णालायत नेतो परंतु डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. आरोपी चालक अद्याप फरार आहे.त्याला शोधण्यासाठी पोलिस पथक नेमलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement