Assam Video: पोलिसांसमोर अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण, व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपीला अटक

आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात एका दुकानदाराने अल्पवयीन मुलाला चोर असल्याच्या संशयाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Assam Video: पोलिसांसमोर अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण, व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपीला अटक
Beaten up (PC - Pixabay)

Assam Video: आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात एका दुकानदाराने अल्पवयीन मुलाला चोर असल्याच्या संशयाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलाला पोलिसासमोर मारहाण केलेच्या व्हिडिओत दिसत आहे. ही घटना शुक्रवारी घडली तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादुल सरमा असे आरोपीचे नाव असून तो सोनितपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली भागातील रहिवासी आहे. अल्पवयीन पीडिता त्याच्याकडे कामाला होता,मुलाने फोन चोरला परंतु फोन त्याच्या सापडला नाही असं नागरिकांनी सांगितले. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढेकियाजुली मार्केट परिसरात सरमाने अल्पवयीन मुलाला खांबाला बांधून मारहाण केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2023 10:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).