Hyderabad Shocker: दुचाकीवरून जात असताना कोसळले झाड, पतीचा जागीच मृत्यू, घटना CCTV कैद (Watch Video)
दुचाकीवरून जात असताना पती आणि पत्नीच्या अंगावर झाड कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना हैद्राबाद येथील आहे. या घटनेत पतीचा जागीच मृत्यू झाला आहे.
Hyderabad Shocker: दुचाकीवरून जात असताना पती आणि पत्नीच्या अंगावर झाड कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना हैद्राबाद येथील आहे. या घटनेत पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. जोडपे दुचाकीवरून सिंकदराबादच्या बोलराम येथील कॅन्टोन्मेंट रुग्णालयाच्या परिसरातून जात होते त्यावेळीस ही घटना घडली. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांना गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपुर्ण घटना सीसीटीव्ही रुग्णालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. झाड पडल्याने परिसरात गोंधळ पसरला आहे. या घटनेची नोंद पोलिसांना देण्यात आली आहे. (हेही वाचा- अपार्टमेंटच्या छतावर पडलेले बाळाला वाचवण्यात यश; ट्रोलिंगमुळे आईची आत्महत्या)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)