Hyderabad Horrific Video: ट्रक चालकाच्या निष्काळाजीपणामुळे आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

हैद्राबादच्या अलवालमध्ये एका ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका ८ वर्षाच्या मुलाच्या जीव गमवावा लागला आहे.

Hydrabad Accident PC Twiiter

Hyderabad Horrific Video: हैद्राबादच्या अलवालमध्ये एका ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका 8 वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागला आहे. चालकाने त्याची डीसीएम लॉरी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. मात्र त्याने हॅंडब्रेक लावला नाही, त्यामुळे डीसीएम लॉरी अचानक पुढे सरकली आणि आईजी पुतळ्याजवळील रस्त्याच्या कडेला आईसोबत चाललेल्या मुलाला डीसीएम लॉरी चिरडले. अपघातानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे. रस्त्यावर उभी असलेली लॉरी पुढे सरकली आणि मुलाला चिरडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now