Vadodara Accident Video: गुजरातमधील वडोदरा येथे भीषण रस्ता अपघात, यु-टर्न घेत असताना भरधाव दुचाकीस्वाराची कारला धडक
गुजरातमधील वडोदरा येथे एक भीषण अपघात घडला आहे. यू- टर्न घेत असताना कारला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
Vadodara Accident Video: गुजरातमधील वडोदरा येथे एक भीषण अपघात घडला आहे. यू- टर्न घेत असताना कारला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाघोड्यातील टायर कंपनीजवळ हा अपघात झाला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रस्त्याच्या वळणावरून एक SUV हळू हळू आपली कार यू-टर्न घेते, तर पलीकडून एक भरधाव दुचाकीस्वार येत होता आणि तो थेट या कारला धडकतो आणि त्यानंतर दुचाकीस्वार उडी मारून खाली पडतो. रस्त्यावरील या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा-कंटनेरच्या धडकेत कारचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, बीड येथील घटना)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)