Beed Accident: कंटनेरच्या धडकेत कारचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, बीड येथील घटना
बीड जिल्ह्यात कारचा भीषण अपघात झाला. कारच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झाला. बर्दापूर फाटा या ठिकाणी घडला. हा अपघात आज पहाटे ५च्या सुमारास हा अपघात घडला.
Beed Accident: बीड जिल्ह्यात कारचा भीषण अपघात झाला. कारच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झाला. बर्दापूर फाटा या ठिकाणी घडला. हा अपघात आज पहाटे ५च्या सुमारास हा अपघात घडला. मृत सर्व लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहिवासी होते. (हेही वाचा- खासदार सुभाष बराला यांच्या कारचा अपघात, सुदैवाने थोडक्यात वाचले प्राण)
मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे समोरून येणाऱ्या कंटनेकचा अंदाज न आल्याने कार आणि कंटनेरची धडक लागली. ही धडक ऐवढी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला. तर कारमध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी पहाटे घडला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला.चौघे जण कार मधून अंबाजोगाई येथे गेले. तेथून लातूर रोडवरून पाचपीर दर्ग्याजवळ आली असता हा अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त लोकांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. सर्व मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतदेह आंबजोगाई येथील शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या अपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात अपघात वाढले आहे. त्यामुळे नागरिक एकीकडे संताप व्यक्त करत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2024 11:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

