Himachal Pradesh Cloud Burst: जदोन गावात ढग फुटीमुळे 7 जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरु
हिमाचल प्रदेशात जोरादार पाऊस सुरु असल्याने अचानक ढग फुटी झाली. या घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Himachal Pradesh Cloud Burst: हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर कायम असताना, सोलनमधील कांदाघाट उपविभागातील जदोन गावात ढग फुटून किमान सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ढगफुटीमुळे दोन घरे आणि एक गोठा वाहून गेला.तसेच, सोलनमधील कांदाघाट उपविभागातील जदोन गावात ढगफुटीच्या घटनेनंतर पाच जणांना वाचवण्यात आले, असे एसडीएम कंदाघाट, सिद्धार्थ आचार्य यांनी सांगितले.
हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर ट्विट केले
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सोलन जिल्ह्यातील जदोन गावात ढगफुटीत सात जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. "सोलन जिल्ह्य़ातील धवला उप-तहसीलच्या गाव जदोन येथे झालेल्या ढगफुटीच्या दुर्घटनेत 7 जणांचा जीव गमावल्याबद्दल ऐकून दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत. या कठीण काळात आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत. आम्ही अधिकाऱ्यांना सर्व शक्य सहाय्य आणि समर्थन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)