Job Fraud: नोकरीच्या नावाखाली फसवणूक; वेबसाइट-ऑफर लेटर, सर्वकाही बनावट, फसवणूक टाळण्यासाठी करा 'या' पद्धतीचा अवलंब
ठग बनावट जॉब सर्चिंग वेबसाइट तयार करतात आणि तिथे खोट्या नोकऱ्यांची माहिती टाकतात. या सापळ्यात अडकून अनेक लोक या नोकऱ्यांसाठी अर्ज करतात.
Cyber Online Job Fraud Prevention Tips: जर तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर चांगल्या नोकरीची जाहिरात दिसली, ज्यामध्ये काम कमी आणि पगार जास्त असेल तर सावधान! ही नोकरी नसून फसवणुकीचा सापळा आहे. OTP मागून पैसे चोरण्याच्या पद्धती आता कालबाह्य झाल्या आहेत. ठगांनी फसवणुकीचे अनेक नवीन मार्ग शोधले आहेत. ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ठग बनावट जॉब सर्चिंग वेबसाइट तयार करतात आणि तिथे खोट्या नोकऱ्यांची माहिती टाकतात. या सापळ्यात अडकून अनेक लोक या नोकऱ्यांसाठी अर्ज करतात. मग हे ठग मोठ्या कंपन्यांचे अधिकारी बनून लोकांच्या मुलाखती घेतात आणि त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देतात. नंतर नोंदणी, प्रशिक्षण किंवा लॅपटॉप देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे मागितले जातात. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर हे ठग त्यांचे नंबर बंद करून गायब होतात.
फसवणुकी कशी टाळावी?
- नोकरीची कोणतीही ऑफर घेण्यापूर्वी, त्याची पडताळणी करा. ज्या क्रमांकावरून ऑफर आली आहे तो नंबर किंवा मेल तपासा.
- ऑनलाइन नोकरी करण्यापूर्वी कधीही पैसे देऊ नका. नोकरी दिल्यानंतर कोणतीही योग्य कंपनी पैसे मागत नाही.
- अनोळखी नोकरी शोधणाऱ्या वेबसाइटवर कोणतेही पेमेंट करू नका.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)