Sainik School Satara Admission 2024: सुरु झाली सातारा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया, जाणून घ्या सविस्तर

या ठिकाणच्या शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. भारत सरकारने 23 जून 1961 रोजी सातारा येथे ही शाळा स्थापना केली होती.

Sainik School Satara

शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या इयत्ता सहावी, इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सैनिक स्कूलच्या प्राचार्या मनीषा दबास यांनी याबाबत माहिती दिली आहे. सैनिक स्कूलमध्ये इयत्ता सहावी आणि नववीच्या उमेदवारालाच प्रवेश दिला जातो. इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा घेतली जाते, त्याद्वारे उमेदवाराची निवड होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 7 नोव्हेंबर 2023 रोजी AISSEE सातारा प्रवेश 2024 फॉर्म जारी केला आहे. सैनिक स्कूल नोंदणी फॉर्म 2024 अधिकृत वेबसाइट, exams.nta.ac.in/AISSEE वर उपलब्ध करून दिला जाईल. सैनिक स्कूल सातारा प्रवेश 2023-24 साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे. NTA AISSEE सातारा प्रवेश 2024 साठी 21 जानेवारी 2024 रोजी प्रवेश परीक्षा घेईल.

दरम्यान, सैनिक स्कूल सातारा ही भारतातील 33 सैनिक शाळांपैकी एक आहे. या ठिकाणच्या शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. भारत सरकारने 23 जून 1961 रोजी सातारा येथे ही शाळा स्थापना केली होती. हे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनशी संलग्न आहे. (हेही वाचा: SBI Clerk Notification 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होत आहे 8,283 पदांसाठी नोकर भरती; जाणून घ्या वयोमर्यादा, अर्ज फी आणि महत्त्वाच्या तारखा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)