जर तुम्ही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) नोकर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार बँकेत बंपर पदांवर भरती होणार आहे. या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासून अर्ज करू शकतील. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला अधिकृत साइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर 2023 आहे. अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8283 कनिष्ठ सहयोगी-लिपिक (Clerk- Junior Associate) पदे भरली जातील.
भरती मोहिमेसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD) प्रमाणपत्र असलेले असे उमेदवार ज्यांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, ते अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. पदवीच्या अंतिम वर्षातील किंवा सेमिस्टरमधील उमेदवारही अर्ज करू शकतात, परंतु त्यांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा पुरावा देणे आवश्यक आहे.
एसबीआय लिपिक भरती 2023 वयोमर्यादा-
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे दरम्यान ठेवण्यात आली आहे.
एसबीआय लिपिक भरती 2023 अर्ज फी-
या भरती मोहिमेसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्जाचे शुल्क 750 रुपये ठेवण्यात आले आहे. अर्ज करणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे. (हेही वाचा: NPCI New Guideline: बंद होऊ शकतो तुमचा UPI आयडी, 31 डिसेंबरपर्यंत करावे लागेल 'हे' काम; जाणून घ्या सविस्तर)
उमेदवाराची निवड कशी केली जाईल?
या पदांसाठी उमेदवारांची निवड विविध टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेच्या आधारे केली जाईल. या अंतर्गत, जानेवारी 2024 मध्ये प्रिलिम परीक्षा आयोजित केली जाऊ शकते. तर मुख्य परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होऊ शकते. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
एसबीआय लिपिक भरती 2023 महत्त्वाच्या तारखा-
- अर्ज सुरू होण्याची तारीख: नोव्हेंबर 17, 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: डिसेंबर 7, 2023
- प्राथमिक परीक्षा: जानेवारी 2024
- मुख्य परीक्षा: फेब्रुवारी 2024दरम्यान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, त्यांना कोणत्या कार्यक्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे याचे पुनरावलोकन करण्याचा सल्ला दिला आहे. पदवीधरांसाठी प्रारंभिक मूळ वेतन रुपये 19,900 आहे आणि
इतरांसाठी रु. 17,900 आहे.