सार्वजनिक आरोग्यविभाग अंतर्गत घेतलेल्या गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द- आरोग्यमंत्री राजेश टोपे

गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती नव्याने घेण्यात येणार आहेत.

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

सार्वजनिकआरोग्यविभाग अंतर्गत दि. 24 ऑक्टोबर 2021 व दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती नव्याने घेण्यात येणार आहेत. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांना नवीन परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठीही वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement