CBSE Board Exam Admit Cards: सीबीएसई बोर्डाच्या 10वी 12वी परीक्षांचे प्रवेशपत्र जारी; जाणून घ्या कुठे कराल डाउनलोड
मात्र परीक्षेची वेळ विषयानुसार बदलू शकते.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी सीबीएसई प्रवेशपत्र 2023 जारी केले आहे. सीबीएसई बोर्ड परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळांमधून प्रवेशपत्रे प्राप्त करू शकतात. 15 फेब्रुवारी 2023 पासून 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. सीबीएसई बोर्डाच्या डेटशीटनुसार, सीबीएसई बोर्डाची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. मात्र परीक्षेची वेळ विषयानुसार बदलू शकते. परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, जी दुपारी 12.30 किंवा 1.30 पर्यंत चालेल. प्रवेशपत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक पाहता येणार आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या. होमपेजवर, तुम्हाला शाळेच्या लॉगिन लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर युजर आयडी आणि इतर माहिती भरून लॉगिन तपशील भरल्यानंतर सबमिट करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर प्रवेशपत्र पाहू शकाल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)