Delhi News: वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनाची रिक्षाला धडक, चालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल
दिल्लीत एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या कारने ई- रिक्षाला धडक दिली.
Delhi News: दिल्लीत एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या कारने ई- रिक्षाला धडक दिली. या अपघातात ई- रिक्षा चालक गंभीर जखणी झाला त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमित झा असं मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. दिल्लीतील मायापूरी परिसरात ही घटना घडली. या अपघातानंतर आरोपी ट्रॅफिक पोलिस अधिकारी मुकेश कुमार यांच्याविरुध्दात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)