Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी
24 आठवडे गर्भधारणेसाठी अल्पवयीन मुलीला फक्त दोन-तीन दिवस उरले होते हे लक्षात घेऊन न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी बाल कल्याण समितीने पीडितेचे पालक म्हणून नियुक्त केलेल्या निर्मल छाया कॉम्प्लेक्सच्या अधीक्षकांना संमतीपत्रावर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली.
Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीला गर्भपाक करण्याची परवानगी दिली आहे. पीडित मुलीच्या वडीलांनी संमती फॉर्मवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर न्यायालयाने मुलीला गर्भापात करण्याची परवानगी दिली. दिल्ली उच्च न्यायालयाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेची वैद्यकीय समाप्ती करण्याची परवानगी दिली. 24 आठवडे गर्भधारणेसाठी अल्पवयीन मुलीला फक्त दोन-तीन दिवस उरले होते हे लक्षात घेऊन न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी बाल कल्याण समितीने पीडितेचे पालक म्हणून नियुक्त केलेल्या निर्मल छाया कॉम्प्लेक्सच्या अधीक्षकांना संमतीपत्रावर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली.
न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, अल्पवयीन पीडितेला बाळाला जन्म देण्याची आणि वाढवण्याची परवानगी देणे, हे पूर्णपणे अयोग्य आहे. कारण, पीडित मुलगी किशोरवयीन असून ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अपुरी आहे.