Delhi Crime: चोरट्याचा महिलेवर हल्ला, मोबाईल हिसकावून फरार, घटना CCTV कैद
दिल्लीत दिलशाद गार्डन परिसरात एका चोरट्याने महिलेवर हल्ला केला आणि तिचा मोबाईल फोन हिसकावून फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Delhi Crime: दिल्ली शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालली आहे. दरम्यान दिल्लीत दिलशाद गार्डन परिसरात एका चोरट्याने महिलेवर हल्ला केला आणि तिचा मोबाईल फोन हिसकावून फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना संपुर्ण परिसरातील जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिलशाद गार्डन परिसरात भरदिवसा ही घटना घडली आहे. आरोपीने महिलेला ढकलून दिले दरम्यान महिलेचा तोल गेल्यामुळे ती जमिनीवर पडली. तेवढ्यात फोन घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)