122 YouTube-Based News Channels Blocked: डिसेंबर 2021 पासून 122 यूट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक; अनुराग ठाकूर यांची माहिती

अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, चॅनेलने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A चे उल्लंघन करणारा मजकूर प्रसारित केला आहे.

YouTube (Photo Credits: Getty Image)

122 YouTube-Based News Channels Blocked: देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेशी संबंधित सामग्री प्रसारित केल्याने 2021 पासून 122 यूट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक (122 YouTube-Based News Channels Blocked) करण्यात आल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, चॅनेलने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A चे उल्लंघन करणारा मजकूर प्रसारित केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिसेंबर, 2021 पासून, भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या, संरक्षणाच्या हितासाठी, आयटी कायदा, 2000 च्या कलम 69A चे उल्लंघन करणारी सामग्री प्रसारित करण्यासाठी 122 YouTube आधारित वृत्त चॅनेलच्या सार्वजनिक प्रवेशास अवरोधित करण्याचे निर्देश जारी केले आहेत, असं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Fake News YouTube Channels Blocked: मोदी सरकारचा फेक न्यूजवर 'Digital Strike'; 8 यूट्यूब चॅनल ब्लॉक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)