Small Saving Schemes Interest Rate: केंद्र सरकारचे सर्वसामान्यांना गिफ्ट; सुकन्या, पोस्ट ऑफिस, शेतकरी बचत, यासह अनेक योजनांवरील व्याजदरात बंपर वाढ
अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी परिपत्रक जारी करून ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सर्व पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना आणि सुकन्या समृद्धी खाते योजनेचे व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे.
Small Saving Schemes Interest Rate: केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या गुंतवणूकदारांसाठी तिजोरी खुली केली आहे. एप्रिल-जून 2023 या तिमाहीसाठी सरकारने लहान बचत योजनांवर लागू होणार्या व्याजदरात 70 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. सरकारने पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या योजनेसह अनेक योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. पीपीएफ बचत योजनेतील गुंतवणूकदारांनाही यावेळी धक्का बसला आहे. कारण सरकारने सलग दुसऱ्या तिमाहीत पीपीएफवरील व्याजदरात वाढ केली नाही.
अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी परिपत्रक जारी करून ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सर्व पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना आणि सुकन्या समृद्धी खाते योजनेचे व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. गेल्या वेळी डिसेंबर तिमाहीत सरकारने व्याजदर 20 बेसिस पॉईंट्सवरून 110 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढवले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)