Robbery Caught on Camera in Bhopal: अग्निवीर जवानाने सोन्याच्या दुकानात केली चोरी, ५० लाख रुपयांचे दागिने चोरले (Watch Video)

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात एका ज्वेलर्सच्या दुकानात ५० लाखांहून अधिक रुपय आणि सोने चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बागसेवानिया भागात ९ ऑगस्ट रोजी घडली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits : File Image)

Robbery Caught on Camera in Bhopal: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात एका ज्वेलर्सच्या दुकानात ५० लाखांहून अधिक रुपय आणि सोने चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बागसेवानिया भागात ९ ऑगस्ट रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी अग्निवीर जवान भारतीय लष्करात आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. आरोपींना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीत दिसल्याप्रमाणे, बंदूकीच्या धाक दाखवत चोरट्यांनी दुकानातून चोरी केली. पोलिसांनी चोरीचा माल जप्त केला आहे. आरोपीकडे कर्ज फेडण्यासाठी त्याकडे पैसे नव्हते म्हणून चोरी केली अशी माहिती समोर आली आहे. (हेही वाचा- आसाममध्ये शिक्षकानी मुलींना वर्गात अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडले, संतप्त स्थानिकांनी शाळा पेटवली)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement