Kerala High Court on Woman’s Attire: महिलांचा पोशाख पुरुषाला तिचा विनयभंग करण्याचा परवाना देत नाही; केरळ उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

महिलांचा पोशाख पुरुषाला तिचा विनयभंग करण्याचा परवाना देत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी केरळ उच्च न्यायालयाने केली आहे.

Kerala High Court (PC - Twitter)

Kerala High Court on Woman’s Attire: महिलांचा पोशाख पुरुषाला तिचा विनयभंग करण्याचा परवाना देत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिपण्णी केरळ उच्च न्यायालयाने केली आहे. केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करण्याला आव्हान देणाऱ्या दोन याचिका निकाली काढताना, कोझिकोड सत्र न्यायालयाची 'लैंगिक उत्तेजक पोशाख' टिप्पणी काढून टाकली.

कोझिकोड सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस कृष्ण कुमार यांनी लैंगिक छळ प्रकरणात लेखक सिविक चंद्रन यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना हे निरीक्षण केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी हे निरीक्षण रद्द केले, परंतु अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा आदेश कायम ठेवला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement