Bengaluru-Woman Wakes In Stranger's Home: पबमध्ये गेलेल्या महिलेला अनोळखी व्यक्तीच्या घरी आली जाग; पीडितेने केला सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पीडित तरुणी शहरातील कोरमंगला भागातील पबमध्ये गेली असता ही घटना घडली. पीडितेला फक्त ती बेशुद्ध झाल्याची आठवण आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका अनोळखी व्यक्तीच्या ठिकाणी तिला जाग आली.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Bengaluru-Woman Wakes In Stranger's Home: बेंगळुरू (Bengaluru) एक विचित्र घटना समोर आली आहे. बेंगळुरूस्थित महिला सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer) शहरातील एका पब (Pub) ला गेली. मात्र, जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती एका अनोळखी व्यक्तीच्या घरी होती. त्यानंतर तिने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला आणि याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पीडित तरुणी शहरातील कोरमंगला भागातील पबमध्ये गेली असता ही घटना घडली. पीडितेला फक्त ती बेशुद्ध झाल्याची आठवण आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका अनोळखी व्यक्तीच्या ठिकाणी तिला जाग आली. पीडितेचा दावा आहे की, तिला अडुगोडीजवळील देवेगौडा लेआउटमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, तिला जाग आल्यावर तिने जवळच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि मदत मागितली.

घरातील रहिवाशांनी पोलिस हेल्पलाइनवर फोन केला आणि औदुगोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली. नंतर तिला कोरमंगला पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तेथे तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - High Court on POCSO Cases: पॉक्सो प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; पीडित आणि आरोपी तडजोड करून सुखी वैवाहिक जीवन जगत असल्यास रद्द होऊ शकते केस)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now