Urvashi Rautela ने पॅरिसमध्ये उंचावली ICC Men's Cricket World Cup 2023 ची चमकदार Trophy, फोटो शेअर करत म्हणाली....

अलीकडे, उर्वशीने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती पॅरिसमधील आयफेल टॉवरच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ची ट्रॉफी हातात घेवुन दिसत आहे.

Urvashi Rautela ICC World Cup Trophy: बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच ही अभिनेत्री आयसीसी विश्वचषक ट्रॉफीमुळेही (ICC Men's Cricket World Cup) चर्चेत आली आहे. अलीकडे, उर्वशीने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती पॅरिसमधील आयफेल टॉवरच्या (Eiffel Tower) पार्श्वभूमीवर क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ची ट्रॉफी हातात घेवुन दिसत आहे. तसेच आयफेल टॉवरच्या पार्श्वभूमीवर ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली अभिनेत्री बनून उर्वशीने एक विलक्षण कामगिरी केली असल्याचे आपल्या सोशल मीडियावर सांगितले आहे. अभिनेत्रीने तिची काही मनोरंजक फोटो शेअर केली आहेत ज्यात ती विश्वचषक ट्रॉफीसोबत चमकदार सोनेरी पोशाखात उभी असलेली दिसत आहे. तिने फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "पॅरिसमध्ये क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ट्रॉफीचे अधिकृतपणे लॉन्च करणारी पहिली अभिनेत्री."

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif