अभिनेत्री Veena Jagtap चं पुन्हा मेट्रोमोनियल साइटवर फेक अकाऊंट; स्क्रिनशॉर्ट शेअर करत व्यक्त केला संताप!

वीणा जगतापला दुसर्‍यांदा तिचं फेक मेट्रोमोनियल अकाऊंट बनवलं गेलं असल्याचा अनुभव आला आहे.

Veena Jagtap| Insta
अभिनेत्री वीणा जगताप चं पुन्हा मेट्रोमोनियल साइटवर फेक अकाऊंट बनवण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान यामध्ये वीणा जगतापचं प्रोफेशन 'सॉफ्टवेअर इंजिनियर' दाखवण्यात आलं आहे. इंस्टाग्राम स्टोरी वर तिने याबाबत पोस्ट केली आहे. त्यामध्ये एका चाहत्याने आपल्या निदर्शनास ही बाब आणून दिली असल्याचं म्हटलं आहे. लोकं असं का करतात? हेच आपल्याला ठाऊक नसल्याचं ते म्हणाले आहेत. मागील वर्षीही असा प्रकार घडला होता असेही तिनं म्हटलं आहे.  वीणा जगताप ही मालिकांमधून चाहत्यांच्या भेटीला आली. बीग बॉस मराठी तिची शिव ठाकरे सोबत असलेली केमेस्ट्रीने ती विशेष चर्चेतही होती. नक्की वाचा: डोंबिवलीतील B-Tech पदवीधर तरुणाने डझनभर महिलांना Matrimonial संकेतस्थळावर लावला चुना.
पहा वीणाची इंस्टा स्टोरी

Veena Jagtap Insta Post

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)