Tunisha Sharma Dies By Suicide: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या

सध्या तुनिशा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती, त्यामुळे तिने एवढं मोठं पाऊल का उचललं हे कोणालाच समजत नाही.

Tunisha Sharma (PC - Instagram)

Tunisha Sharma Committed Suicide: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. यासंदर्भात वालीव पोलीसांनी माहिती दिली आहे. सध्या तुनिशा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती, त्यामुळे तिने एवढं मोठं पाऊल का उचललं हे कोणालाच समजत नाही. अभिनेत्रीचे वय अवघे 20 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. वयाच्या 20 व्या वर्षी तिने हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.  तिने टीव्हीवर अनेक शो केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)