TMKOC Actor Gurucharan Singh Missing: अभिनेता गुरुचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता, वडिलांकडून तक्रार दाखल; 'तारक मेहता...' मध्ये साकारली होती रोशनसिंग सोढीची भूमिका

वडिलांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे गुरचरण सिंगने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो सोडला होता. त्यावेळी त्याला आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचे होते.

TMKOC Actor Gurucharan Singh Missing: अभिनेता गुरुचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता, वडिलांकडून तक्रार दाखल; 'तारक मेहता...' मध्ये साकारली होती रोशनसिंग सोढीची भूमिका
Gurucharan Singh

TMKOC Actor Gurucharan Singh Missing: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये रोशनसिंग सोढीची भूमिका साकारून अभिनेता गुरचरण सिंग लोकप्रिय ठरला होता. आता माहिती मिळत आहे की, गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात गुरचरण सिंग बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. गुरचरण सिंग 22 एप्रिल रोजी दिल्ली विमानतळावर दिसला होता, तेथून त्याला मुंबईसाठी फ्लाइट पकडायची होती. मात्र, तो मुंबईला पोहोचला नाही आणि तेव्हापासून घरी परतला नाही.  त्याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो अयशस्वी ठरला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांनी याबाबत तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. वडिलांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे गुरचरण सिंगने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो सोडला होता. त्यावेळी त्याला आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचे होते. (हेही वाचा: Aamir Khan Deepfake Video: आमिर खानच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल, सायबर गुन्हे शाखेकडून तपास सुरु)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement