Aamir Khan Deepfake Video: आमिर खानच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल, सायबर गुन्हे शाखेकडून तपास सुरु
आमिर खानच्या तक्रारीनंतर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखा तपास करत आहे.
अभिनेता आमिर खान राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याची डीपफेक तंत्रज्ञानाद्वारे बनवलेली चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी खार पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. आमिर खानचा आवाज बदलण्यात आला असून ही चित्रफीत ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातील आहे. त्यात भाजपवर टीका करून आमिर काँग्रेसला पाठिंबा दर्शवत असल्याचे दाखवले आहे. आमिर खानच्या तक्रारीनंतर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखा तपास करत आहे.
पाहा पोस्ट -
Amir Khan Deep Fake Video: आमिर खान का डीप फेंक वीडियो, मुंबई पुलिस ने दर्ज की एफआईआर, जाँच शुरू https://t.co/MisJgmtX3E
— news wala (@NewsWalaOrg) April 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2024 11:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

