Naseem Shah On Urvashi Rautela: नसीम शाहने उर्वशी रौतेलाला ओळखण्यास दिला नकार, म्हणाला- मला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही

पण या वृत्तांवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने आता पुढे येऊन वक्तव्य केले आहे.

Naseem Shah And Urvashi Rautela (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे (Urvashi Rautela) नाव सध्या पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहसोबत (Naseem Shah) जोडले जात आहे. उर्वशी नुकतीच आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतासोबत पाकिस्तान (IND vsPAK) संघाची मॅच पाहताना स्टेडियममध्ये दिसली होती. तेव्हापासून नसीमचे नाव उर्वशीसोबत सोशल मीडियावर जोडले जात आहे. पण या वृत्तांवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने आता पुढे येऊन वक्तव्य केले आहे. तो उर्वशीला ओळखतही नसल्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे. उर्वशी कोण आहे हेही त्यांना माहीत नाही. नसीम शाह म्हणाले की, जर कोणी त्यांना पसंत करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण आता माझा क्रिकेट खेळण्याचा त्याचा प्लॅन आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)