Naatu Naatu at Oscar: यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’; राहुल सिप्लीगंज आणि काला भैरव करणार गाण्याचे लाईव परफार्मंस

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात RRR चे सुपरहिट गाणे 'नाटू नाटू' हे सादर होणर आहे.

RRR (Photo Credit - Twitter)

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) गाण्याने काही दिवसांपूर्वी गोल्डन ग्लोब (Golden Globe) पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता या गाण्याला ऑस्करमध्येही (Oscar) नामांकन मिळालं आहे. हे गाणं यंदा भारताला ऑस्कर मिळवून देईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. 12 मार्च रोजी ऑस्कर अवॉर्ड्स 2023 चे आयोजन होणार आहे या पुरस्कार सोहळ्यात राहुल सिप्लीगंज आणि काला भैरव हे परफॉर्म करताना दिसणार आहेत. ते RRR चे सुपरहिट गाणे 'नाटू नाटू' हे दर्शकांसमोर सादर करणार आहे. ऑस्कर पुरस्काराच्या आयोजकांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)