ज्येष्ठ अभिनेत्री, लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन; वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. गेली अनेक वर्षे त्या आजारी होत्या.
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी पुण्यात निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्षे त्या आजारी होत्या आणि अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्या सुनेने निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २०१६ मध्ये रंगमंचावर लावणी सादर केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा मोठा झटका आला. तेव्हापासून त्या आजारपणाशी झुंज देत होत्या.
कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककला क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. लावणीतील सहजता, प्रभावी अभिनय आणि हावभाव यांमुळे त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळाली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement