Subhedar Trailer: 'सुभेदार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पाहायला मिळणार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास (Watch Video)

हा सिनेमा 18 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Subhedar (PC - You Tube)

लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लवकरच त्याच्या शिवराज अष्टकमधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' अशा अनेक सुपरहिट सिनेमांच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर आता सुभेदार या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे शिवरायांचे शूरवीर मावळे तान्हाजी मालुसरेच्या पराक्रमावर आधारित आहे. हा सिनेमा 18 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे, तर मृणाल कुलकर्णी जिजाऊ साहेबांची भूमिका साकारणार आहे. (हेही वाचा: 'बाईपण भारी देवा...' पाहून सचिन तेंडुलकरचा दीपा परबला आला व्हिडिओ कॉल; अभिनेत्रीने शेअर केला 'DREAM COME TRUE MOMENT')

Subhedar Trailer- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)