'बाईपण भारी देवा...' पाहून सचिन तेंडुलकरचा दीपा परबला आला व्हिडिओ कॉल; अभिनेत्रीने शेअर केला 'DREAM COME TRUE MOMENT'

सहा बहिणींच्या कहाणीमध्ये दीपा परबने 'चारू' ही शेंडेफळ असलेल्या बहिणीची भूमिका बजावली आहे.

'बाईपण भारी देवा...' पाहून सचिन तेंडुलकरचा दीपा परबला आला व्हिडिओ कॉल; अभिनेत्रीने शेअर केला 'DREAM COME TRUE MOMENT'
Sachin Tendulkar | Instagram

सैराटचे विक्रम मोडीत काढत बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करणार्‍या 'बाईपण भारी देवा...' चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. नुकतच या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग सचिन तेंडुलकर साठी ठेवण्यात आलं होतं. अजित भुरे, राज ठाकरे, दिग्दर्शक केदार शिंदे याला हजर होते. अशावेळी चित्रपटातील कलाकारांची देखील उपस्थिती होती पण ' तू चाल पुढं' च्या शूटिंग मध्ये व्यस्त असलेल्या दीपा परबला मात्र या स्क्रिनिंगला उपस्थित राहणं  शक्य नव्हतं. त्यामुळे उपस्थितांपैकी एकाने दीपाला चक्क व्हिडिओ कॉल लावून देत सचिनशी संवाद घडवून दिला. दीपाने या व्हिडिओ कॉलची झलक इंस्टाग्राम वर शेअर केली आहे. सोबतच एक खास पोस्ट लिहून हा आपल्या आयुष्यातील 'ड्र्रिम कम ट्रू' अनुभव असल्याची भावना व्यक्त केली आहे. Baipan Bhaari Deva Box Office Collection: 'बाईपण भारी देवा'चे रेकॉर्डब्रेक कलेक्शन; तीन आठवड्यात 50 कोटींची कमाई.

पहा दीपा परब ची पोस्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2023 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).