Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचं मराठीतून ट्वीट; लवकरच करणार नव्या मराठी प्रोजेक्टची घोषणा

आपल्या अनेक मुलाखतीमध्ये नवाजुद्दीनने त्याचे मराठी चित्रपटावरचे प्रेम जाहीर केले आहे.

बॉलिवूडमध्ये नाव कमावलेला नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा  मराठी चित्रपट, (Marathi Movie) नाटक, (Marathi Drama) लोककलेचा चाहता आहे. आपल्या अनेक मुलाखतीमध्ये नवाजुद्दीनने त्याचे मराठी चित्रपटावरचे प्रेम जाहीर केले आहे. कोर्ट हा सिनेमा तर सर्व भारतीयांनी पहावा असे त्याने अनेक मुलाखतीमधून सांगितले आहे. नवाजुद्दीनने नुकतंच मराठीत ट्वीट केलं आहे. २७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येणाऱ्या मराठी राजभाषा दिनानिमित्त नवाजुद्दीनने हे ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने “मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे! मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच! सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा !! लवकरच अभिजीत पानसे यांच्याबरोबर काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे”, असं म्हटलं आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now