Ankita Walawalkar Trolled: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरवर आपल्या व्हिडिओमुळे झाली ट्रोल

10 हजारात जॉब करणाऱ्या मुलीने किंवा मुलाने सेल्फ रिस्पेक्ट हा प्रकार बोलू नये असे बोलल्याने अंकिता अडचणीत आली आहे.

सोशल मीडियावर विशेष सक्रिय असणारी 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर तिच्या लेटेस्ट व्हिडिओमुळे चांगलीच ट्रोल झाली आहे. अंकिताने काही दिवसांपूर्वी एक शॉप सुरू केलं आहे. यासंदर्भातील विविध अपडेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. दरम्यान तिला या शॉपमध्ये कामासाठी मुलगी हवी होती. यासंदर्भातच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. अंकिताने व्हिडिओत सांगितल्यानुसार बीए झालेल्या त्या मुलीने या कामासाठी तिला स्पष्ट नकार दिला. शॉप मॅनेजर म्हणून काम करणारी मुलगी झाडू का मारेल, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. 10 हजारात जॉब करणाऱ्या मुलीने किंवा मुलाने सेल्फ रिस्पेक्ट हा प्रकार बोलू नये असे बोलल्याने अंकिता अडचणीत आली आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)