पोलिसांनी ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावल्याचा Ameya Khopkar यांचा आरोप; उपस्थित केला 'हा' प्रश्न

या मराठी चित्रपटाचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा असे पोलीस दलाला वाटत नाही, असा आरोप नेते अमेय खोपकर यांनी केला आहे

Ameya Khopkar | (File Image)

शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'भोंगा' हा मराठी चित्रपट 3 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. ट्रेलर आणि चित्रपटाचा विषय पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता होती. परंतु या मराठी चित्रपटाचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा असे पोलीस दलाला वाटत नाही, असा आरोप नेते अमेय खोपकर यांनी केला आहे. पोलीस अधिकारी प्रदर्शकांना हा चित्रपट न दाखवण्याचा आग्रह करत असल्याचे खोपकर यांनी ट्वीट करत सांगितले आहे. पोलिसांचे हे कृत्य कोणत्या अधिकारात बसतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement