Kolkata Doctor Rape-Murder Case: 'घरातला मुलगा संध्याकाळी 7 नंतर...'; कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणावर अभिनेता Siddharth Chandekar ने व्यक्त केला संताप (Watch Video)
या तरुणीला न्याय मिळावी, आरोपींना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. विविध क्षेत्रातील लोक या घटनेवर आपला संताप व्यक्त करत आहेत. आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने या घटनेबाबत आपले विचार मांडले आहेत.
Kolkata Doctor Rape-Murder Case: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या विरोधात संपूर्ण देश एकवटला आहे. ज्या स्थितीत आणि परिस्थितीमध्ये पिडीतेचा मृतदेह सापडला होता, त्यावरून ती हिंसाचाराची अत्यंत घृणास्पद कृती असल्याचे दिसून येते. महत्वाचे म्हणजे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या कथित सुरक्षित आवारात ही घटना घडली. आता या तरुणीला न्याय मिळावी, आरोपींना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी अनेक ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. विविध क्षेत्रातील लोक या घटनेवर आपला संताप व्यक्त करत आहेत. आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने या घटनेबाबत आपले विचार मांडले आहेत.
सिद्धार्थने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, ‘मुलगी शिकली प्रगती झाली, हे आपण बोलायला नको. मुलगी शिकतेय, तिला शिकू दिले जात नाहीये. आपल्या घरातील मुलगी संध्याकाळी 7 च्या आत घरात परत येत आहे की नाही हे बघण्यापेक्षा, आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी 7 नंतर कुठे जातो, काय करतो, काय संगत आहे त्याची, कोणाशी बोलतोय, काय विचार आहेत त्याचे... हे बघणे जास्त गरजेचे आहे. खरेच या देशातला मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला, तर या देशाची प्रगती झाली.’ (हेही वाचा: Kolkata Doctor Case: पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड; डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याचे आले समोर)
पहा संपूर्ण व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)