 
                                                                 कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचे प्रकरण देशभरात जोर धरताना दिसत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये डॉक्टर संपावर असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान उपस्थित केले जात आहे. पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये ॲडल्ट व्हिडिओ सापडले आहेत. यासोबतच त्याच्याबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. (हेही वाचा - Kolkata Rape-Murder Case: निदर्शनादरम्यान RG Kar Medical College मध्ये हिंसाचार; जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड)
प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर फक्त बलात्कार झालेला नसून सामूहिक बलात्कार झाला आहे, अशी धक्कादायक माहिती पोस्टमॉर्टम अहवालातून उघड झाली आहे. त्यामुळे आता कोलकाता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या डॉक्टरवर फक्त एकाच व्यक्तीने बलात्कार केला असल्याचे कोलकाता पोलिसांनी सांगितले होते. पण पोर्स्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाब उघड झाली आहे. पीडितेवर एका व्यक्तीने नाही तर अनेकांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती उघड झाली आहे.
मृत डॉक्टरच्या शरीरात 150 मिलीग्रॅम सिमन मिळाले. हे सिमन एका व्यक्तीचे नाही. डॉक्टरवर ज्यांनी बलात्कार केला त्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग असू शकतो, असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर येत आहे. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात संजय रॉय या आरोपीलाअटक केली होती. त्यामुळे या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे सांगितले जात होते. पण आता या प्रकरणात एक नाही तर अनेकजण सहभागी असल्याचे उघड झाले आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
